मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशन व लायन्स क्लबचा उपक्रम
शबनम न्युज | अमळनेर okbet cricket
okbet fiba world cup
येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊं डेशन (पुणे), लायन्स क्लब, यांच्या संयुक्त विदयमाने दोन दिवसीय स्तनाचा कर्करोग विनामूल्य तपासणी (फ्री मेमोग्राफी टेस्ट), शिबिराचा ५ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. सुमारे पाचशे महिलांनी लाभ घेतला. शिबिर बुधवार, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे पीडीजी डॉ. रवींद्र कुलकर्णी होते. यावेळी ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रोस्कोपी मार्गदर्शक तथा जनरल सर्जन डॉ. रोहन पाटील (जळगाव), मानिनी फाऊं डेशन (पुणे). च्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट योगेश मुंदडा व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. भारती चव्हाण यांनी प्रस्ताविकात महिलांनी स्वतःमधील अज्ञान, भीती, खर्चिक बाबी यासंदर्भात विचार न करता ही तपासणी आवर्जून करण्याचे आवाहन केले.
डॉ. रोहन पाटील म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगाचे देशात प्रत्येक चार मिनिटांत एक महिला दगावत आहे. परंतु तरीही भीती अथवा घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने ४० वर्षापुढील वयाच्या महिलांना शरिरात चरबी वाढल्याने, आरोग्याकडे लक्ष न दिल्याने, आईला कर्करोग असल्यास अनुवंशिकतेने व गर्भनिरोधक गोळयांचा जादा वापर केल्याने होतो. यासाठी स्तनांच्या कर्करोगाच्या यासदंर्भात नेहमी स्वतःला सजग ठेवावे. व्यायामाकडे लक्ष दयावे. ‘मेमोग्रॉफी टेस्ट’ यामध्ये एक्स-रे काढून या रोगासंदर्भात वैदयकीय अधिका-यांकडून योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे ही चाचणी महिलांनी आवर्जून करून घ्यावी.
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनीही स्तनांच्या कर्करोगासंदर्भात विविध दाखले देत या रोगासंदर्भात सदैव दक्ष राहण्यासंदर्भात महिलांना बहुमोल मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी पुणे, मुंबई येथे आलेले वैदयकीय अधिकारी, तंत्रज्ञ, मानिनी फाऊं डेशन कोअर कमिटी मेंबर्स अनुक्रमे संजय पाटील (कन्हेरे, कृषिभूषण सतीश काटे (कोळपिंप्री), अतुल पाटील (बहादरवाडी), महेश पाटील (रंजाणे), डॉ. दिनेश पाटील (दळवेल), भारती पाटील (चौबारी), छाया पाटील (सडावण), पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार, लायन्स क्लबचे सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, एमजेएफ विनोद अग्रवाल, झोनल चेअरमन नीरज अग्रवाल, सदस्य जितेंद्र जैन, डॉ. प्रशांत शिंदे, जितेंद्र कटारिया, प्रदीप अग्रवाल, शेखर धनगर, हरिकृष्ण सैनी, प्रितम मणियार, हेमंत पवार, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, नगरसेवक प्रताप शिंपी, श्याम गोकलाणी, सत्यपाल निरंकारी,
लक्ष्मण पंजाबी, विनोद कदम, राजू देशमुख, बाळू पाटील, योगेश महाजन, चंद्रकांत कखरे, राकेश पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वरत्न अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासन अधिकारी भरत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
स्नेहा एकतारे यांनी सूत्रसंचालन केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.
सदर शिबिरामध्ये अमळनेर शहर आणि तालुक्यातील १००१ महिलांची चाचणी करण्यात आली. बेसिक चाचणी नंतर सुचविण्यात आलेल्या अॅडव्हान्स चाचणी साठी अमळनेर मधील डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सहकार्य करण्याचे जाहिर केले.
ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया ची आवश्यकता लागल्यास डॉ. रोहन पाटील, जळगाव आणि गुलाबराव देवकर चॅरिटेबल हॉस्पिटल सहकार्य करायची तयारी दर्शविली आहे.
सर्व सेवा विनामुल्य देण्यात येणार आहे.
महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती होणे आवश्यक असून योग्यवेळी निदान होण्याची गरज आहे असे प्रतिपादन मानिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा प्रकारची शिबिरे घेण्यात येईल अशी माहिती दिली. OKBET/a>
okbet esports