पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष प्रा.सौ. कविता अल्हाट यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दिला यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादी वतीने प्रा.सौ. कविता अल्हाट यांच्यावर कारवाई करत त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. यानंतर त्वरितच अजित पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रा.सौ. कविता अल्हाट यांची पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहे . दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी राष्ट्रवादीची संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला आपण सहकार्य कराल या आशयाचे नियुक्तीपत्र कविता अल्हाट यांना देण्यात आले आहे.
त्यांच्या निवडीनंतर रूपाली चाकणकर यांनी प्रा.सौ.कविता अल्हाट यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या निवडीबद्दल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून प्रा.सौ. कविता अल्हाट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता महानगर पालिकेत राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका जास्तीत जास्त निवडून आणण्याचे उद्देश असल्याचे यावेळी प्रा.सौ.कविता आल्हाट यांनी सांगितले