शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील मनपा शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा कुदळवाडी क्रमांक 89 या शाळेत या नवीन शैक्षणिक वर्ष 23 24 मध्ये इयत्ता आठवीचा नवीन वर्ग सुरू करण्यात आलेला असून, या वर्गाच्या दोन तुकड्या सुरू आहेत. सध्यस्थिती शाळेत एकूण 23 वर्ग तुकड्या असून, शाळेचा पट १००० असून दररोज नवीन ऍडमिशन सुरू आहेत. शाळेत महानगरपालिकेचे फक्त बारा शिक्षक व मानधनावर काम करणारे सहा शिक्षक असे एकूण 18 शिक्षक उपलब्ध आहेत उर्वरित आठ वर्गांना शिक्षक उपलब्ध नसल्याने शाळेतील शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच बालवाडीचा सद्यस्थितीचा पट 120 असून एकच बालवाडी शिक्षिका उपलब्ध आहे. नवीन ऍडमिशन सुरू असल्याने अनेक पालकांच्या तक्रारी शिक्षक नसल्याने येत आहेत. तरी या विषयाचा गांभीर्याने विचार करून या शाळेसाठी आठ शिक्षक व दोन बालवाडी शिक्षक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दिनेश यादव यांनी मनपा आयुक्त कडे केली आहे.