शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील नवीन नोंदणी कार्यालय त्वरित चालू करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील ऍड. बाळासाहेब थोपटे यांनी नोंदणी, महानिरीक्षक नवीन प्रशासकीय इमारत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पुणे व पिंपरी चिंचवड मनपाहद्दीत 27 नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील सध्याची लोकसंख्या ही 70 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड मनपाची जवळपासचे परिसरातील म्हणजेच हवेली तालुक्यातील गावांची लोकसंख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. सदरच्या गावातील दस्त नोंदणी हे याच नोंदणी कार्यालयात होत असते. त्यामुळे सध्या पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत असलेली 27 नोंदणी दुय्यम निबंध कार्यालय अतिशय अपुरी पडत आहेत. एका नोंदणी कार्यालयाची एक वर्षाची क्षमता शासनाने नियमानुसार 8 हजार दस्त नोंदणी इतकी असते. प्रत्यक्षात सर्वच नोंदणी कार्यालयात दुपटीपेक्षा जास्त नोंदविले जात आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील सर्वच नोंदणी दुय्यम निबंध कार्यालयात दिवसभर गर्दी असते. त्यामुळे करोडो रुपये कर देणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा दिवसभर थांबून सुद्धा जास्त होत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. नागरिकांचे जास्त वेळेत नोंदणी होत नाहीत. दिवसभर नागरिकांना थांबावे लागते, त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड मनपाहद्दीत आणखी 27 नोंदणी कार्यालय तातडीने चालू करण्यात यावे, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.