शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली साने चौक येथे रात्री कामगारांवर झालेल्या कोयता हल्ला घटनेच्या संदर्भात साने चौक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यश साने यांनी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
सोमवारी रात्री बाराच्या सुमारास चिखली, मोरे वस्ती येथील साने चौकात कोयता हातात घेतलेल्या गुंडांनी हायदोस घातला, रात्रपाळीवरून घराकडे निघालेल्या कामगारांवर या गुंडांनी कोयत्याने हल्ला केला, दहशत माजविली, एका महिलेवरही त्यांनी हल्ला केला असाच प्रकार मोरे वस्ती येथील टावर लाईन येथे घडला आहे तसेच परिसरात ही या गुंडांनी वाहनांची तोडफोड केली तसेच तीन जणांवर कोयत्याने वार केले, कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांचे मोबाईलही हिसकावून नेले असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे या प्रकारामुळे मोरेवस्ती परिसरात नागरिक भयभीत झालेले आहेत त्यामुळे प्रशासनाने मोरे वस्ती तसेच साने चौक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी यश साने यांनी केली आहे.