पिंपरी चिंचवड शहरातील सौ.सरिता अरुण साने व शिवसेना पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी सेक्टर नंबर 24 सेक्टर नंबर 25 सेक्टर नंबर 26 सेक्टर नंबर 27 सेक्टर नंबर 28 आकुर्डी व पंचतारा नगर येथील सर्व नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्रची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रभागातील ज्या नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनविणे किंवा दुरुस्त करावयाचे असेल या सर्व नागरिकांनी दिनांक 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत सौ.सरिता अरुण साने यांचे जनसंपर्क कार्यालय, सत्यम ज्वेलर्स समोर, साने चेंबर, सेक्टर 24 ,प्राधिकरण निगडी येथे संपर्क साधावे असे आवाहन. सौ. सरिता अरुण साने यांनी केले आहे.
मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा करिता पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असेल तसेच मतदान कार्ड ,लाईट बिल, टॅक्स पावती, बँक पासबुक, गॅस पावती ,पासपोर्ट यापैकी एक रहिवासी पुरावा म्हणून आवश्यक असेल अशी आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे
Advertisement