शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड : – आपल्या देशाच्या मातृभूमी विषयीची कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे कायम स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान ९ ऑगस्ट, २०२३ पासून राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेचा शनिवार दिनांक १२/८/२०२३ रोजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने पक्ष नेते नामदेवजी ढाके यांच्या हस्ते प्रभाग क्र. १८ येथे शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या प्रसंगी प्रभाग क्र. १८ मधील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Advertisement