शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर स्टेट परिसरात पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या व वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत या परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष आकाश अनिल सागरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी याकरिता मनपाच्या शहरांना भेटून निवेदन दिले यानंतर मनपा प्रशासन वतीने या परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यात आले, तसेच हे रस्ते वाहतुकीला सुरक्षित झाले आहे आकाश सागरे यांच्या या कार्य तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले तसेच महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाचेही यावेळी आकाश ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.