शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील माजी विरोधी पक्ष नेते तथा माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस 15 ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा होत आहे नाना काटे यांच्या या वाढदिवसानिमित्त संकल्प सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभेचे उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या माध्यमातून मुकाई चौक किवळे रावेत परिसरात भव्य डोळे तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप हा उपक्रम राबविण्यात आला या डोळे तपासणी शिबिरामध्ये असंख्य नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली तसेच उपचार ही सुरू केले सदर डोळे तपासणी शिबिर बापू दिनकर कातळे यांचे जनसंपर्क कार्यालय मुकाई चौक किवळे येथे सोमवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान संपन्न झाले या शिबिरास अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली सर्व उपस्थितितांचे व या शिबिरात लाभ घेतलेल्या नागरिकांचे बापू दिनकर कातळे यांनी आभार व्यक्त केले.
विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प सोशल फाउंडेशन व श्री.बापु दिनकर कातळे यांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप, जनरल चेकअप आयोजित करण्यात आले शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्कृष्ट अशा प्रतिसाद दिला. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शिबिराला भेट दिली, त्यावेळी संजय कातळे,अंकुश तरस, शंकर तरस,संदीप तरस,तुकाराम तरस,दिलीप तरस, प्रसाद कातळे, सुनील कांबळे, रामहरी टिळेकर, ज्ञानेश्र्वर शेळके, सुरेश वैरागर, सचिन पवार, बाबू मराठे, भाऊसाहेब धावारे आदी मान्यवर उपस्थित होते.