शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
वाकडचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांनी आपल्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून गडकिल्ले संवर्धन कार्याला हातभार लावला.त्यांच्या या कार्याचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यासह मित्र परिवाराने कौतुक केले.
महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन करणारी संस्था सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सह्यादी प्रतिष्ठान संपर्क प्रमुख रविंद्र मोहोळ यांच्याकडे मदत सुपूर्त करण्यात आली.
यावेळी युवा उद्योजक राहुल विनोदे, गणेश कलाटे, सोमनाथ कलाटे, संजय भुजबळ, प्रमोद वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे, जिवन केदारी, रमजान सय्यद यांचे चिरंजीव समीर सय्यद यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी रोखठोकशी बोलताना सय्यद म्हणाले, आपण इतिहास घडवू नाही शकलो तरी तो जोपासू शकतो. ऐतिहासिक गडकिल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. भावी पिढीला गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती समजावी, त्यांना ती पाहता यावी, वाचता यावी यासाठी प्रत्येकांनी पुढे आले पाहिजे. आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुल ना फुलांची पाकळी म्हणून गडकिल्ले संवर्धनासाठी हातभार लावला आहे. इतरांनी देखील असाच पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील सय्यद यांनी केले.