शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन सेवेच्या फीचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना केली आहे.
नाना काटे म्हणाले, आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील ४५ मीटर व ४५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांना परवानगी देताना वार्षिक आग सुरक्षानिधी म्हणून जी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी आकारण्यात येते ती खूप असून यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना आर्थिक भुर्दंडाला सामोये जावे लागत आहे, मुळात सध्य स्तिथीत आपल्या महापालिकेतर्फे आकारण्यात येणारी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी ही ठाणे, पुणे, नाशिक यांच्यापेक्षा खूप जास्त असूनस यामध्ये मोठी तफावत आहे, या गोष्टीचा विचार करता आपण यामध्ये त्वरित सुधारणा करावी व तसे आधेश पारित करावा. व यासंबंधी नुकताच राज्य शासनाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक फी सुधारणा हा आदेश दि. ८ जून २०२३ रोजी पारित केला असून अध्याप त्याची अंबलबजावणी देखील झालेली नाही तरी आपल्या आकरण्यात येणाऱ्या फी संरचने यामध्ये सुधारणा करून या राज्य शासनाचा आदेशाची अंबलबजावणी करावी व शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना फीच्या नावाखाली वर्षाला बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडातून सोडवावे, असेही ते म्हणाले.