पिंपरी चिंचवड : निगडी : निगडी-यमुना नगर ,साईनाथ नगर,त्रिवेणी नगर ,ओटा स्कीम ,सेक्टर नंबर 22 या भागात मोकाट जनावरांचा व श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी आज पशुवैद्यकीय उप आयुक्त श्री. संदीप खोत यांना निवेदन दिले आहे. आणि आपण मागील निवेदनावर कोणतीही कारवाई केलेली नाही. असे मत प्रसाद कोलते यांनी उपायुक्तांन समोर मांडले आहे.
आपल्या निष्काळजी पणाचा त्रास नागरिकांना होत आहे. आपण या मोकाट जनावरांचा व श्वानांचा बंदोबस्त लवकरात लवकर केला नाही तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य ईमारतीत श्वान व मोकाट जनावरे आणून सोडण्यात येतील आसा इशारा पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते, यांनी दिला आहे. त्यांच्यासोबत सौ.शुभांगीताई काळवीट ,सौ.शुभांगीताई जोशी व इतर नागरिक उपस्थित होते.
Advertisement