शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव, आळंदी जि. पुणे येथिल शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रध्वज पूजन मा. श्री. मधुकर सोळंकी – मा. वायुसेना अधिकारी यांच्या हस्ते झाले तर ध्वजारोहण मा. प्राचार्य श्री. चंद्रमणी इंदुरकर – तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी राजा शिवछत्रपती विद्यालय आणि आदित्य इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. चंद्रमणी इंदुरकर – मा.प्राचार्य तुरुंग अधिकारी, प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतांना स्वातंत्र्य म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान, निर्भरता असून भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जपला पाहिजे. कारण जो इतिहासाकडे डोळे झाक करतो तो कधीच इतिहास घडू शकत नाही यावर भाष्य करीत देशातील प्रत्येक नागरिकाने प्रथम देशाचा व नंतर स्वतःचा विचार करणे मूलभूत कर्तव्य असून आपल्या शिक्षणाचा वापर देशहितासाठी करणे आवश्यक आहे. अस्तित्वात असलेली मोबाईल संस्कृती तरुणाईला कशी घातक आहे. यासंदर्भात विविध उदाहरणे देत स्पर्धेच्या युगात तरुण वर्गाने स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. तसेच मा.श्री. मधुकर सोळंकी- मा. वायुसेना अधिकारी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना देशातील तरुण वर्ग जोपर्यंत घर सोडत नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्यांचे घर कळत नाही, असे मत व्यक्त करीत भारताची वायुसेना कशी जगापेक्षा वेगळी व महाराष्ट्रीयन संस्कृती कशी स्वाभिमानाची व अभिमानाची आहे या संदर्भात विवेचन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- मा. श्री. विशाल विलासराव तांबे, सचिव- वैभव विलासराव तांबे व खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले, मा.श्री.राजीव पाटील – व्यवस्थापकीय सल्लागार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर्जेराव बरकडे यांनी केले तर श्री अतुल पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी मा. श्री. संजय कांबळे संस्थापक- लक्षवेध करियर अकॅडमी कोल्हापूर व पुणे जिल्हा, मा. श्री. अभंग सर – टायकोंडो राष्ट्रीय क्रीडा मार्गदर ज्ञानेश्वर वरुटे – प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक, मा.श्री. विठ्ठल कोंडीबा तळेकर – मा.सरपंच डुडुळगाव, डॉ. हंसराज थोरात प्राचार्य – शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डॉ. प्रमोद इंगळे प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, सौ. शितल पाटील मुख्याध्यापिका – आदित्य इंटरनॅशनल स्कूल व श्री.अतुल पानसरे मुख्याध्यापक – राजा शिवछत्रपती विद्यालय, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनियर कॉलेज, राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.