शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
शहरातील मोकाट फिरणाऱ्या गाई वासरांना मोठ्या प्रमाणात लंपी आजार होत आहे. लंपी आजाराने सर्व गाय, वासर त्रस्त आहेत. या मोकाट फिरणाऱ्या गाई वासरांना वाचविण्यासाठी प्रशासनाकडून लवकर उपचार करण्यात यावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.
तसेच यमुना नगर स्कीम नंबर 10 सुवर्णयोग मित्र मंडळ येथे एक गाय व तिचे वासरू लंपी आजाराने त्रस्त असल्याने तडफडत होते याची माहिती सचिन चिखले यांना मिळताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दगडे यांना फोन करून सदर गाई व वासर यांना पशुवैद्यकीय विभागात नेण्यात आले तसेच त्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच सचिन चिखले यांच्या मागणीचे दखल घेता पशुवैद्यकीय अधिकारी दगडे यांनी सांगितले की, प्रभागातील सर्व गाई आणि वासरे यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात येईल.
यावेळी प्रसाद कोलते, बाबा परब, प्रमोद बोबे, रोहित काळभोर, आरोग्य विभागाचे मांढरे, सोमनाथ काळभोर, ओमकार पवार यांनी मदत केली. तसेच सर्व गाई वासरांचे लंपी आजाराचे लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सचिन चिखले यांनी यावेळी दिली.