शबनम न्यूज | प्रातिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने सामान्य नागरिकांची कामे पूर्ण व्हावी याकरिता प्रभाग निहाय जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते, ही जनसंवाद सभा प्रशासकीय कारभारात संपन्न होत असते. १३ मार्च २२ ला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि १४ मार्च २०२२पासून प्रशासन कारभार सांभाळत आहे. जनसंवाद सभेची वेळ ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता असते ही वेळ बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता माधव पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
.त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असतो त्यामुळे चाकरमान्यांना कामासाठी वेळेत जावे लागते त्यात मनपा वतीने पाणी दर दिवस आड तासभरात असल्यामुळे महिलावर्ग सकाळी घरगुती कामात व्यस्त असतात त्यामुळे जनसंवाद सभेत त्यांना उपस्थिती दर्शविता येत नाही तसेच आपल्या अडचणी सांगण्यास ते जनसंवाद सभेत उपस्थित राहू शकत नाही लोकशाहीत न्यायपालिका प्रशासन आणि कायदेमंडळ चालवते कायदेमंडळ ठराविक वेळीच काम करते.
जनसंवाद सभा शनिवार किंवा रविवार रोजी घ्यावी या सभेत सामान्य लोकांपैकी एकाला अध्यक्ष बनवावे महिन्यातून एकदा प्रशासनाने तसदी घ्यावी जेणेकरून तीस लाख पिंपरी चिंचवडकरांसाठी अनेक लोक या सभेत लोकांच्या अडचणी मांडण्यासाठी सहभागी होतील प्रशासनाला अनेक अडचणींचे निवारण करण्यास मदतच होईल असेही माधव पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे