शबनम न्यूज | पिंपरी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या आम्हाला पिंपरी चिंचवड शहर बंद पुकारण्यात आला होता, पिंपरी चिंचवड शहर बंद आंदोलनासाठी शहरात अनेक संघटना एकवटल्या त्यातच पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे यांनीही आपल्या मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती , ताम्हाणे वस्ती , साने चौक परिसरातील दुकानदारांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची विनंती केली व बंद शंभर टक्के यशस्वी करण्यास प्रयत्न केले. तसेच पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात सहभागी झालेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे यांनी आपल्या समर्थकांच्या सह आंदोलनात सहभाग घेतला व मराठा क्रांती मोर्चा या आंदोलनाला आपला पाठिंबा देत पिंपरी चिंचवड शहर बंद यशस्वी करण्यास मोलाचा वाटा उचलला.