शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसृत केले आहे.नवीन आकृतीबंधानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांनी २ मे २०२३ रोजीचा प्रस्ताव आणि शासनाने अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या शासन स्तरावरील समितीची शिफारस विचारत घेवून नगरसचिव उल्हास जगताप यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने पदस्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली. महापालिका आस्थापनेवरील पात्र एकमेव अधिकारी असल्याने त्यांची अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्ती केली