शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहर दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. तसेच गणरायाची आरती केली. याच दरम्यान पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ किवळे येथे भेट देऊन अजित पवार यांनी गणरायाची आरती केली.
यावेळी अजित पवार यांचे बापू दिनकर कातळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल व ताशांच्या गजरात स्वागत केले. तसेच पुष्पगुच्छ देऊन अजित पवार यांचा सन्मान केला. यावेळी संकल्प सोशल फाउंडेशनचे पर्यावरण पूरक सजावट स्पर्धेच्या सन्मानपत्राचे अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अजित पवार यांनी यावेळी या पर्यावरण पूरक उपक्रमाची संपूर्ण माहिती घेतली व या उपक्रमाचे कौतुक करून बापू दिनकर कातळे करीत असलेल्या सामाजिक कामाची ही माहिती घेतली.
आपल्या सामाजिक कार्यातून समाजातील विविध घटकांना लाभ मिळावा, या हेतूनेच समाजकार्य करत असल्याबद्दल बापू दिनकर कातळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.