शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
अखिल थेरगाव युवा मंच यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थेरगाव मधील नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता गौरी गणपतीच्या घरगुती सजावटीचा स्वतंत्र फोटो किंवा एक मिनिटाचा व्हिडिओ व सजावटी सोबत सेल्फी मागविण्यात आल्या होत्या.
या काळात परीक्षकांनी स्पर्धकांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. 21 सप्टेंबर पर्यंत एकूण 400 नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक चे 32 स्मार्ट टीव्ही, द्वितीय क्रमांक ओव्होन, तृतीय क्रमांक गॅस शेगडी, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस ज्यूसर आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. सदर स्पर्धेचे आयोजन भाजपा महिला आघाडी थेरगाव चे अध्यक्ष करिश्मा ताई सनी बारणे व चिंचवड किवळे मंडल भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सनी बारणे यांनी केले आहे.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर थेरगाव येथील बारणे क्रीडांगण येथे होणार असल्याचे सनी बारणे यांनी सांगितले आहे.