शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
सध्या वनडे विश्वचषकच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा झटका देखील बसला आहे. भारतीय गटातील सलामीवीर शुभमन गिल याला डेंग्यूचा आजार झाल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात देखील तो मुकला होता तसेच बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात देखील गिलची अनुपस्थितीत असणार आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट समिती उर्वरित सामन्यांसाठी शुभमन गिलच्या सहभागा बद्दल लवकरच निर्णय घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समिती गिलच्या जागी एका खेळाडूचा समावेश करण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी चर्चा करण्यास तयार आहे. संघाने निवड समितीला विनंती केल्यास यशस्वी जयस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड यांना बॅकअप म्हणून संघात स्थान मिळू शकते. मात्र 14 ऑक्टोबरला होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला शुभमन गिल मुखण्याची दाट शक्यता आहे.
वन डे विश्वचषकातील भारतीय संघ - कर्णधार - रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयश अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव,मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.