प्रतिनिधी | मोसमी केवट
शबनम न्युज | पुणे
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होत असल्याचे आपल्याला दिसून येते.अशातच पुणे येथे एका अज्ञात इसमाने महिलेची ऑनलाईन फरवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना दि. 20 मार्च रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान पुणे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने संगणकाच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याची गोपनीय माहिती काढली व त्यानंतर महिलेच्या फोनपे च्या युपीआय मधून 2000 रुपये तर फोन पे आणि एटीएमच्या युपीआय द्वारे 21, 800 रुपये आणि 5000 रुपये रक्कम फरवणुक करून बँक अकाउंटमधून काढून तब्बल एकूण 28,800 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याबाबत महिलेने एका आरोपी इसमावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी इसमावर भा. द. वि. क. 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 60 ( क) , 66 ( ड) प्रमाणे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत,