शबनम न्युज | पुणे
भांडणाचा राग मनात धरून त्याचा बदला घेण्यासाठी शस्त्र बाळगले. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून कोयता व चाकू जप्त करण्यात आला आहे. तळेगाव-चाकण रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच सुमारास ही कारवाई केली.
शुभम अनिल भोसले, (वय 26 ), साईराज कैलास शेवकर (वय 19 ),सूर्यकांत धनराज माने (वय 19 ),सागर विठ्ठल वारे (वय 20 सर्वजण रा. तळेगाव दाभाडे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस हवालदार दत्तात्रय बनसोडे यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले व साहिल म्हाळसकर यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून त्याचा बदला घेण्यासाठी शुभम भोसले आणि त्याच्या साथीदार एकत्र आले. साहिल म्हाळसाकर याला मारण्यासाठी त्याचा शोध त्यांनी सुरू केला. दरम्यान, शुभम भोसले यांच्या चारचाकी वाहनांमधून कोयता व चाकू बेकायदेशीररीत्या बाळगून ते फिरत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली असता, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने कारवाई करून शुभम भोसले आणि त्याच्या साथीदारांना पकडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.