शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री.दीपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन आयोजित भव्य सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२३ हि उत्साहात पार पडत आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी “RUNAL GATEWAY Housing Society “, Ravet येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते देवीची आरती करून पार पडला. कार्यक्रमाची शृंखला सुरू असताना लहान मुलांनी देखणीय कलेचे सादरीकरण केले. रास दांडिया व गरबा रंगत असताना त्याचा उत्साह अधिक वाढवण्याचे काम भारतीय जनता पक्ष चे शहराध्यक्ष शंकर सेठ जगताप, यांनी कार्यक्रमाला भेट देऊन केले.
फाउंडेशन च्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री.दिपक भोंडवे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आयोजन व केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगळा- वेगळा आनंद आणि दिपकभाऊं वर येथील नागरिकांचा असणारा प्रेम या कार्यक्रमातून दिसून येतं असे मत शहराध्यक्षांनी व्यक्त केले. मनोगताच्या शेवटी मा.जगताप यांनी येथील नागरिकांच्या व आपल्या मनातली गोष्ट जाहीरपणे बोलून सर्वांची मने जिंकली आणि उपस्थिततांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.या वेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या सह अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .