गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे या उत्सवाच्या आनंदात आणखी भर घातली ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) व युवक कार्याध्यक्ष तुषार भाऊ ताम्हाणे यांनी , तुषार भाऊ ताम्हाणे यांच्या वतीने ताथवडे व पुनवळे परिसरातील नागरिकांसाठी सोसायटी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन या नवरात्र उत्सवात करण्यात आले .
स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सेव्हन प्लुमेरिया ड्राइव्ह सोसायटी पुनावळे यांनी पटकाविले 7777 रोख व सन्मानचिन्ह, असे पारितोषिक देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक पिरॅमिड अटलांटिक सोसायटी यांना 5555 रोख व सन्मानचिन्ह, देण्यात आले , तृतीय पारितोषिक आर सिक्सटीन एव्हीन्यू यांना 3333 रोख व सन्मानचिन्ह, देण्यात आले तर चतुर्थ पारितोषिक गंगा ओरम गंगा आंगण ताथवडे, यांना मान्यवरांच्या हस्ते चिंचवड येथील हॉटेल रिजंट डांगे चौक येथे आयोजित समारंभात देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे , युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश विशाल वाकडकर, युवक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश विशाल काळभोर, राष्ट्रवादी जिल्हा निरीक्षक शितलताई हगवणे, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, परीक्षक स्वप्नाजी राऊत, राष्ट्रवादी चे पदाधिकारी लवकुश यादव, संकेत जगताप व गणेश गायकवाड, सुरेंद्र सुरोशे, आदी मान्यवर उपस्थित होते तर सूत्रसंचालक महेश गोरे यांनी केले.