शबनम न्युज | मनोरंजन
७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एकदिवस आधी शुक्रवारीच ‘हम हिंदुस्तानी’ हे गाणं रिलीज करण्यात आलंय. ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील तब्बल १३ दिग्गजांनी गायलेल्या या गाण्यानं तरुणाईचा उत्साह आणि देशाभिमानाची भावना दुपटीने वाढवली आहे.
प्रियांका शर्मा आणि पारस मेहता यांच्या ‘धमाका रेकॉर्ड्स’चं हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्याने तब्बल १२ लाख व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. कोरोनासारख्या कठिण काळातून लवकरच बाहेर पडू आणि पुन्हा पहिल्यासारखं जगात वावरू शकतो, असा विश्वासं या गाण्यातून व्यक्त करण्यात आला आहे.
‘धमाका रेकॉर्ड्स’च्या या गाण्याला सोनू निगम, कैलाश खेर, अलका याग्निक, शब्बीर कुमार, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुति हसन, पद्मिनी कोल्हापुरे, अनिल अग्रवाल, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबैर यांनी आपला सुरेल आवाज दिलाय.