शबनम न्यूज | पिंपरी
शंकरराव मोहिते स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अकलूज जि. सोलापूर येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलांच्या संघाने पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यांदा विजेतपद मिळवले.
19 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम फलंदाजी करत सोलापूर ग्रामीण या संघाला 12 ओव्हर मध्ये सर्व बाद 122 धावांचे आव्हान देण्यात आले त्याच प्रतिउत्तर देताना सोलापूर ग्रामीणचा संघ 11.5 ओव्हरमध्ये सर्व बाद 69 धावा मध्ये संपुष्टात आला त्यामुळे राजमाता जिजाऊ च्या संघाने 53 धावांनी दणदणीत विजय मिळवून सलग चौथ्यांदा विजेतेपद संपादन केले त्यामध्ये फलंदाजी मध्ये प्रफुल्ल कानडे 22 बॉल 38 धावा, गणेश काळेल 13 बॉल 37 धावा, श्रेयस मंदिलकर 7 बॉल 15 धावा, सुमित केंगार 12 बॉल 20 धावा पटकावत उत्कृष्ट फलंदाजी केली व त्यांना लोकेश चौधरी 3 विकेट, गणेश काळेल 2 विकेट, सारंग बावले 2 विकेट,प्रितम सुर्यवंशी 1 विकेट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.या संघातील खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
19 वर्षाखालील मुलांच्या संघात कु.परिक्षित सांडभोर, अश्विन भापकर, सुमित केंगार, पुष्कर कारखिले, सारंग बावले,प्रितम सुर्यवंशी, सार्थक चव्हाण, सुभरकांत दास, हर्षवर्धन टिंगरे, सारंग बावले, जयवंत मेगावत, श्रेयस मंदिलकर,गणेश काळेल, प्रफुल्ल कानडे,लोकेश चौधरी, हर्ष जाधव या खेळाडूंचा समावेश होता.या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व दत्तात्रय वाळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.