शबनम न्यूज | पिंपरी
पिंपळे सौदागर विश्वशांती कॉलनी येथील अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सदर काम रखडलेले होते. या प्रभागातील मा. नगरसेवक विठल उर्फ नाना काटे आणि शितलताई नाना काटे यांच्या कडून वेळोवेळी सदर काम करण्यात पाठपुरावा करण्यात येत होता.
सदर तक्रारींचे दखल घेत महापालिका स्थापत्य विभागाच्या वतीने पिपंळे सौदागर येथील विश्वशाती कॅालनी नं ६ येथील रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.
Advertisement