शबनम न्युज | पिंपरी
विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील कु. विकास विमल मंडळ (अकरावी विज्ञान) या विद्यार्थी खेळाडूने सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात 52 किलोग्राम वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले व कु. ओम राजेंद्र माटे (अकरावी वाणिज्य) या विद्यार्थी खेळाडूंनी 75 ते 80 किलोग्रॅम वजन गटात सुवर्णपदक मिळविले. तसेच कु. वैष्णवी सचिन शिंगोटे (बारावी कला) या विद्यार्थी खेळाडूने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात 45 किलोग्रॅम वजन गटात कास्यंपदक प्राप्त केले आहे. त्यामुळे या खेळाडूंची रांची झारखंड येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या सर्व खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.