शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील निगडीतील यमुनानगर येथील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन केले होते. विशेषतः या मोर्चात परीसरातील मराठा बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदविला.
राज्यात मराठा आरक्षणाला सर्व स्तरातुन पाठींबा मिळत असून ठिकठिकाणी सकल मराठा समाजाकडून साखळी आंदोलन सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील यमुनानगर येथे सकल मराठा समाज आणि ग्रामस्थांनी एकञ येऊन कॅन्डल मार्च मोर्चा आयोजित केला होता. या कँडल मार्च मोर्चाला प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रिडा संकुल येथून सुरुवात होऊन भक्ती – शक्ती स्मारकाजवळ येऊन त्याचा यशस्वीपणे समारोप झाला.
या मोर्चात जेष्ठ नागरीक, महिला, तरुण, लहान मुले अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा सक्रीय सहभाग होता.सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने हा मोर्चा यशस्वीरीत्या पार पडला. या कँडल मोर्चाने केवळ मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला नाही तर गंभीर बाबींना तोंड देण्यासाठी आपण सामुदायिकरित्या एकञ आहोत हा संदेशही दिला.