शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक 27 मधील सोसायटी धारकांसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस चे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश विला रॉयल मॅजेस्टिक, के के श्रीराम रोजे मेहेर, रॉयल एलियन्स लीगसी, विस्ता के.के. कृषांत लाईफ ३६०, अशा रहाटणी परिसरातील आठ सोसायटीमध्ये गेली सहा वर्षापासून रखडलेल्या एम एन जी एल गॅस पाईपलाईनचे काम भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर सेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ आप्पा तांबे यांच्या माध्यमातून सुरू आहे.
या महाराष्ट्र नॅचरल गॅस च्या उद्घाटनामुळे सोसायटीमधील रहिवासी यांना मोठा आनंद झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. तसेच या निमित्ताने महिला भगिनींना दिवाळीच्या आधी गिफ्ट मिळाल्याचे आनंद झाले आहे. तांबे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, पुढील काळात लवकरात लवकर या महाराष्ट्र नॅचरल गॅस च्या माध्यमातून दोन हजार फ्लॅट धारक जोडले जाणार आहेत.
यावेळी सोसायटीमधील चेअरमन, त्यांचे कार्यकारी मंडळ ,सदस्य, सभासद यांच्यासह दीपक जाधव, मयूर शिंगारे, नीरज भोसले, स्वप्निल आभाळे, राकेश गोलांडे, तात्या शिंगारे, वैभव पोळ, अनिकेत नारखेडे, ओंकार तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.