शबनम न्युज | पिंपरी
स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार “स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी” अभियान राबविणेबाबत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांनी पत्र क्र.राअस/स्वच्छ दिवाळी/७२९/२३-२४, दि.०६/११/२०२३ अन्वये कळविले आहे. सदर अभियानाचे अनुषंगाने नागरिकांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळून, स्वच्छ व प्रदुषण रहित तसेच पर्यावरण पुरक स्थानिक उत्पादनांचा वापर करुन दिवाळी साजरी करावी यासाठी ३० सेकंदांचा शॉर्ट व्हिडीओ/रील बनविणेची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना या स्पर्धेमध्ये सहभागी होणेसाठी आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धेकरीता खालील बाबींचा समावेश असेल.
१. सदर स्पर्धा फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील नागरिकांसाठी आहे.
२. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल.
३. प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देण्यात येईल. रोख स्वरूपात अदा करण्यात येणा-या बक्षिसांचे स्वरूप पुढील प्रमाणे राहील.
बक्षिसांची संख्या:-३०
बक्षिसांची एकूण रक्कम:-रू.२२,०००
१) प्रथम क्रमांक
१० बक्षिसे
१०००/- प्रत्येकी
२) द्वितीय क्रमांक
१० बक्षिसे
७००/- प्रत्येकी
३) तृतीय क्रमांक
१० बक्षिसे
५००/- प्रत्येकी
अशी एकूण ३० बक्षिसे देण्यात येणार असून बक्षिसाची रक्कम रू.२२,०००/- इतकी आहे.
४. स्पर्धेचे निकष खालीलप्रमाणे असून या निकषांचा वापर करुन शॉर्ट व्हिडीओ/ रील बनविण्यात यावेत.
- फुलांच्या रांगोळीचा वापर.
- RRR सेंटर वर निरूपयोगी साहित्य दान करणे.
- सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळणे.
- दिवाळी साजरी करताना पर्यावरण पूरक (Eco friendly) साहित्यांचा वापर करणे.
- दिवाळी भेटवस्तू देताना सिंगल युज प्लास्टीकचा वापर न करता पर्यावरण पूरक (Eco friendly) साहित्य भेटवस्तू म्हणून देणे.
- प्रदुषणरहित दिवाळी साजरी करणे
- प्लास्टिक फ्री शॉपिंग.
- Eco friendly साहित्यापासून बनविलेले आकाश कंदील वापरणे.
- टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे.
५. स्पर्धेच्या अटी व शर्ती-
- यासाठी वयाची अट नाही.
- स्पर्धक पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा.
- शॉर्ट व्हिडीओ/रील हा नाविन्यपुर्ण (creative) असावा.
- शॉर्ट व्हिडीओ/रील बनवून #SwachhDiwali या हॅशटॅगचा वापर करुन सोशल मिडियावर पोस्ट करणे तसेच @sbmurbangov आणि @pcmcindiagovin या ट्विटर व इन्स्टाग्राम हँडलला टॅग करणे अनिवार्य आहे. तसे नसल्यास सदर शॉर्ट व्हिडीओ/रील स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही.
वरील सर्व निकष एकत्रितरित्या पुर्ण करणाऱ्या शॉर्ट व्हिडीओ/रील ला प्राधान्य दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल व बनविलेला शॉर्ट व्हिडीओ/रील sbm.ihhl@pcmcindia.gov.in या ई-मेल आय-डी वर दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठविण्यात यावा. यानंतर येणारे शॉर्ट व्हिडीओ/रील विचारात घेतले जाणार नाही. निवड प्रक्रियेबाबत समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अटी-शर्ती ठरविणे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार मा.सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग यांना राहतील.
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, नागरिकांच्या सहकार्याने आणि पाठींब्याने शासनाच्या स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशस्वी होऊ शकते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी या अभियानांतर्गत शॉर्ट व्हिडीओ/रील बनविणेचे स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभाग प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.