शबनम न्यूज , प्रतिनिधी :
चिंचवड दि. १०, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा, नाट्य परिषद कार्यालय, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे अध्यक्ष मा. भाऊसाहेब भोईर व श्री गिरीश महाजन, (नियामक मंडळ सदस्य, मध्यवर्ती) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी चिंचवड शाखेची सन. २०१८ – २३ च्या कार्यकारिणी समिती ची मुदत संपुष्टात आली असल्याने मध्यवर्ती च्या सुचेननुसार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणी समितीची निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला. सदर निवडणुकीसाठी मध्यवर्तीकडून श्री गिरीश महाजन यांची निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेमध्ये निवडणुकीविषयी चर्चा झाली. मध्यवर्तीच्या शाखा व्यवस्थापन समितीने केलेल्या नियमांची सविस्तर माहिती मध्यवर्तीचे उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब भोईर आणि शाखा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गिरीश महाजन यांनी सभेला दिली.
त्यानंतर २० जणांनी समिती मध्ये काम करण्यात इच्छा असल्याचे सांगितले. या विषयावर सभेमध्ये साधक बाधक चर्चा करून १७ जणांच्या कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. सभेला मोठ्या संखेने पिंपरी चिंचवड शाखेचे सभासद उपस्थित होते.
सन २०२३-२८ साठी निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे
१) श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर , नाट्य निर्माते
२) श्री. राजेशकुमार नौपतलाल साकला , निर्माता
३) श्री. कृष्णकुमार किशोरीलाल गोयल, निर्माता
४) श्री. किरण धुंडिराज येवलेकर, रंगकर्मी
५) श्री. सुहास दामोदर जोशी, रंगकर्मी, दिग्दर्शक
६) श्री. राजेंद्र मदनलाल बंग , नेपथ्यकार
७) श्री. संतोष गोपाळ रासने , अभिनेता, दिग्दर्शक
८) सौ. गौरी यशवंत लोंढे , अभिनेत्री, दिग्दर्शक
९) श्री. संतोष रतन शिंदे, दिग्दर्शक, रंगकर्मी
१०) श्री. नरेन्द्र दिगंबर आमले, रंगकर्मी
११) श्री. जयराज राम काळे , रंगकर्मी
१२) श्री. सुदाम मनोहर परब, रंगकर्मी
१३) श्री. हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर , निर्माता
१४) श्री. मनोज डाळिंबकर, रंगकर्मी
१५) श्री. मुकेश घोडके, रंगकर्मी
१६) श्री. आकाश प्रदीप थिटे , निवेदक
१७) सौ. रुपाली आनंद पाथरे, अभिनेत्री
इत्यादींची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्याल आली तसेच,
सल्लागार समिती म्हणून खालील मान्यवरांची नेमणूक करण्यात आली
१) श्री. हेमेंद्रभाई डाह्याभाई शहा
२) श्री. राजेंद्र रामभाऊ गोलांडे
३) श्री. प्रकाश सोपान जगताप