पिंपरी चिंचवड – प्रतिनिधी,
पिंपरी चिंचवड : दिवाळी पाडवा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी- चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पक्षाच्या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे, अशी आमची भावना आहे. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्री. विशाल काळभोर, शहर कार्याध्यक्ष श्री. प्रसाद कोलते, कार्याध्यक्ष श्री. तुषार ताम्हाणे आणि सहकारी उपस्थित होते.
पक्ष कार्यालय माझ्यासाठी निश्चितच श्रद्धास्थानी आहे. कारण आजपर्यंत दिग्गज नेत्यांनी याच कार्यालयातून समाजसेवेचा आदर्श उभा केला आहे. हा वारसा आम्ही युवकांनी पुढे चालवण्याचा संकल्प या निमित्ताने पुन्हा एकदा केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पिंपरी- चिंचवडमधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!