शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या संघटिका सरिता साने यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘दिवाळी विसावा सुरमई शाम’ या प्रेमाची उधळण करणाऱ्या हिंदी चित्रपटातील गाण्यांची अविस्मरणीय मैफल ‘मौसम प्यार का’ चे आयोजन करण्यात आले. या गीत संगीत असलेल्या कार्यक्रमात प्यार का मौसम अशी थीम घेऊन डॉ. सौ. भाग्यश्री कश्यप आणि त्यांच्या टीम ने अफलातून कार्यक्रम सादर केला.
अवीट गोडीची गाणी सादर केली. वादा रहा सनम,सून महिया,होश वालो को खबर क्या..,मन क्यू मेहेका,जाने जिगर जानेमन,साथीयां ये तुने क्या किया,तुने ओ रंगीले कैसा जादू किया अशी अनेक गाणी उत्तम प्रकारे सादर झाली. वैजू चांडवडे,रश्मी बडे आणि भूषण कुमार या अत्यंत ताकती च्या गायकांनी रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवलं, तर या संगीतमय कार्यक्रमात वादक म्हणून रशीद शेख, नितीन पवार, रोहित साने, नंदू देविड व ध्वनी मुद्रण शशीभाई यांनी आपली कामगिरी उत्तम पार पाडली. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचा अनेक महिला, पुरुष, नागरिकांनी आनंद घेतला.
सदर कार्यक्रम हा शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजे दरम्यान, निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाठोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे संपन्न झाला.
मौसम प्यार का या संगीतमय कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री राधासागर ठरली, बहुचर्चित चंद्रमुखी या मराठी चित्रपटात शेवंताच्या भूमिकेत राधासागर आपणास पाहावयास मिळाली. तसेच मराठी धारावाहिक आई कुठे काय करते? व सुंदरा मनामध्ये भरली, यामध्ये आपण राधासागर हिचा अभिनय पाहिला आहे. राधासागर हिने आपले चित्रपट क्षेत्रातील अनुभव सांगितले, राधा सागर मंचावर येताच प्रेक्षकांमध्ये अति उत्साह पाहावयास मिळाला. सौ सरिता साने यांच्यावतीने राधासागर यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली यामध्ये या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते (ईरफान भाई सय्यद), शिवसेना शहरप्रमुख (निलेश तरस), समीर जावळकर- (बीजेपी उपाध्यक्ष), बाळा शिंदे-(ज्येष्ठ नागरिकांचे माणसपुत्र), हेमचंद्र जावळे-(शिवसेना शहर समन्वय), दिलीप पांढरकर-(ज्येष्ठ नेते), अपर्णा मिसाळ-(मैत्री व्यासपीठाच्या अध्यक्षा), शैला पाचपुते-(शिवसेना जिल्हा संघटिका), शर्मिला बाबर-(बिजेपी नगरसेविका), पल्लवी ताई पांढरे-( राष्ट्रवादी पिंपरी विधानसभा अध्यक्षा), तेजस्विनी कदम-(बिजेपी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस), शोभा कदम- (ॲडवोकेट), शैला निकम- (पिंपरी विधानसभा प्रमुख), संगीता कदम- (शिवसेना उपशहसंघटिका) (विजया मानमोडे,शैला पाटिल), शेफाली मयेकर, स्मिता पद्मन, शारदा जगताप, भावना फुलझडे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी,शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रसिकांनी या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रदीप स्वीट्स या प्रसिद्ध स्वीट मार्ट ने रसिकांना नाश्ता दिला. गेली सहा वर्षे सौ सरिता ताई दिवाळी विसावा चे नियोजन करीत आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करणे आणि रसिकांना उत्तम कार्यक्रमांचा लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश असतो. सौ ज्योती कानेटकर आणि सौ कल्याणी देशमुख यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे सरिता साने यांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आले.