शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते चेतन महादेव पवार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर युवा सेना प्रमुख पदी निवड झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या युवा सेना शहर प्रमुख पदी चेतन महादेव पवार यांची नियुक्ती केली आहे.
मागील महिन्यातच चेतन पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला होता त्यावेळेसच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी युवकांना दिशा दाखविणारे काम तुम्हाला करायचे आहे, मी तुम्हाला आदित्य ठाकरेंसोबत जोडून देणार आहे, लवकरच तुमची जबाबदारी देखील निश्चित करण्यात येईल अशा शब्दात सन्मान करून शब्द दिला होता त्यानुसार चेतन पवार यांची युवा सेना प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
चेतन पवार यांची शहरातील युवकांवर चांगली पकड आहे, युवा कार्यकर्त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. निश्चितच चेतन पवार यांना मिळालेल्या जबाबदारीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात युवकांना एकजूट करून पक्षाची ताकद वाढविणार यात शंका नाही.
चेतन पवार यांच्या या नियुक्तीनंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.