शबनम न्युज | पिंपरी
जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था अंतर्गत राज्यस्तरीय क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती पुरस्कार वितरण सोहळ्याचे,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,गंज पेठ पुणे ,येथे रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी,सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२३,ने सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डीच्या शिक्षिका,लेखिका,कवयित्री,पर्यावरण प्रेमी सौ.प्रतिमा अरुण काळे यांचा सन्मान,शाल,सन्मान पत्र व ट्रॉफी देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष,जेष्ठ कामगार नेते,विचारवंत मा.डॉ. बाबा आढाव सर,उदघाटक या,मा.रुपालीताई चाकणकर,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा)या होत्या.
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे संपादक मा.अभिजीत कांबळे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रवीण दादा गायकवाड,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मा.विशाल लोंढे साहेब,इतिहास संशोधक व सुप्रसिद्ध वक्ते,मा.श्रीमंत कोकाटे सर आणि
विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेते मा.किरण माने आदी मान्यवरांच्या हस्ते भव्य पुरस्कार वितरण व जगदिश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.या सर्व मान्यवरांचे हृदयाला व मेंदूला भिडणारी मनोगते एकता आली,त्यांच्याशी संवाद साधता आला.