शबनम न्युज | पुणे
साहित्य चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या पुणे शहरात पुस्तक वाचक महोत्सव भरत आहे. या उत्सवात होणा-या भव्य पुणे पुस्तक प्रदर्शनाच्या पूर्वदिनाला बालवाचकांची भव्य दिंडी शुक्रवारी (दि. 15) सकाळी निघणार आहे. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्यात वाचन संस्कृती रूजवण्यासाठी या दिंडीचे आयोजन संवाद पुणे संस्थेने केले असल्याची महिती संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली आहे. हे पुणे पुस्तक प्रदर्शन फर्ग्यसन महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार आहे. या निमित्ताने सुमारे तीस दिंड्या प्रदर्शन स्थळी येणार असून त्याल बालवाचकांची ही एकमेव दिंडी संवाद पुणेची आहे.
सुनील महाजन म्हणाले, वाचनाची गोडी लहानपणापासूनच मुलांच्यात रुजवली तर ते पुढे चांगले वाचक होतील. वाचन संस्कृती ही मुलांच्या व्यक्तीमत्वातही मोलाची भर टाकते हे अनेक मान्यवरांच्या अनुभवातून अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला बालवाचकांची दिंडी आम्ही आयोजित केली आहे. लहान मुलांसाठी वाचनाची पुस्तकांचे प्रकाशन गेली अनेक वर्षे करत असलेल्या व प्रत्येक मुलाच्या तोंडी नाव असलेल्या बालभारती येथून शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रदर्शन स्थळाकडे प्रस्थान ठेवेल. पुणे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाने केले असून त्याचे मुख्य संयोजक राजेश पांडे आहेत.
साहित्य कलाअकादमी पुरस्कार विजेते लेखक ल. म. कडू, राजीव तांबे, डॉ. संगीता बर्वे, शामची आई चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ, बालसाहित्यिक (लेखिका) आराध्या नंदकर, पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकसेवा ई स्कूल पाषाणचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, ईस्कूलच्या मुख्याध्यापिका चैत्राली जैन, आदी मान्यवर दिंडीच्या प्रस्थानाच्या वेळी उपस्थित रहाणार आहेत. बालवाचक दिंडीची संकल्पना संवाद पुणे संस्थेची आहे.
या दिंडीमध्ये ढोल पथक, लेझीम, पालखी, महाराष्ट्राची महान संत परंपरा, ऐतिहासिक व्यक्तीरेखांच्या वेषभूषेतील मुले, कॉमिक वल्र्ड, मोराल स्टोरीज, विविध राज्यातील पारंपारिक वेषभूषेतील बाल कलाकार, ऑटो बिओगर्गिस, नो आबाऊट पोएट, रामायणातील वेषभूषेतील कलाकार असे सुमारे 500 शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही दिंडी बालभारतीपासून निघणार असून बीएमसीसी, रानडे इन्सिटट्यूट ते फर्ग्यसन महाविद्याल मैदनावर दिंडीचा समारोप होणार आहे.