शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे माजी महापौर तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, संजोग वाघेरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहे या दोन गटात शहरात चढाओढीचे राजकारण पाहावयास मिळत असतानाच माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेणे व लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार.
संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास २०१९ मध्ये इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी जोरदार तयारी केली होती, परंतु ऐनवेळी अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघाकरिता त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने संजोग वगैरे यांना माघार घ्यावी लागली होती.
परंतु आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा महायुतीत आहे व आगामी लोकसभा निवडणूक ही महायुतीमध्ये राहूनच राष्ट्रवादी लढणार आहे, मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाला जाणार असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे उमेदवारां साठी चाचपणी सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीच्या फुटी नंतर संजोग वाघेरे हे अजित पवार गटात होते. परंतु आज संजोग वाघेरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली असल्याने ते दोनच दिवसात शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उपनेते सचिन आहेर ,राज्य संघटक एकनाथ पवार पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार माजी शहरप्रमुख योगेश बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.