शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त “ही भीमजयंती नाचून नाही तर पुस्तके वाचून साजरी करा” असे अभिनव आवाहन उपस्थित नागरिकांना नवदुर्गा सखी मंचाच्या अध्यक्षा सौ रुपाली साने यांनी केले.
बहुजन साम्राज्य मंडळ, टॉवर लाईन, मोरेवस्ती यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास भोसरी मतदार संघातील युवा नेते पांडाभाऊ साने व त्यांच्या पत्नी नवदुर्गा सखी मंचाच्या अध्यक्षा सौ रुपाली साने उपस्थित होते या वेळी त्या बोलत होत्या , सचिन मोहिते यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. .
यावेळी सर्वप्रथम पांडाभाऊ साने व त्यांच्या पत्नी नवदुर्गा सखी मंचाच्या अध्यक्षा सौ रुपाली साने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन मोहिते यांनी मांडली.
यावेळी सागर पोटभरे, रमेश शिंगारे, प्रतिभाताई भालेराव, अनिताताई पोटभरे, मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.