शबनम न्युज | पिंपरी
डिसेंबर महिना संपत आला आहे सर्वांनाच नवीन वर्षाचे वेध लागले आहे. 2024 चे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते शाम भाऊ जगताप यांच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, सदर प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची हस्ते संपन्न झाले यावेळी चिंचवड विधानसभेचे नेते तथा मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवा नेते तानाजी भाऊ जवळकर उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाम जगताप यांच्याकडून सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर दिनदर्शिकेत अतिशय माहितीपूर्वक गोष्टींची तसेच शाम जगताप यांच्या विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. शाम जगताप दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन करतात. याही वर्षी त्यांनी 2024 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिंचवड येथे केले आहे. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी श्याम जगताप यांना शुभेच्छा दिल्या.