शबनम न्युज | पुणे
पी.एच.डी साठी 10 जानेवारीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) जाहीर केला होता. मात्र, हा निर्णय बार्टीने फिरवला आहे. नव्या निर्णयानुसार आता सीईटी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत 2019 च्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यावर आक्षेप घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीत आधीची परीक्षा रद्द करून 10 जानेवारीला फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच दहा तारखेला होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. परीक्षा ठरलेल्या तारखेनुसार 10 जानेवारीला घेण्यात येईल असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी नमूद केले आहे.