शबनम न्युज | मुंबई
नवीन वर्षी आमिर खान याची कन्या आयारा खान हिने नुपूर शिखर सोबत लग्नगाठ बांधली. ३ डिसेंबर रोजी ते दोघे लग्न बंधनात बांधले गेले. सदर लग्न नोंदणी पद्धतीने झाले. लग्नात नूपुरच्या कपड्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. नुपूरने बनियान आणि शॉर्ट मध्ये लग्न केले. त्याच्या या कपड्याची विशेष चर्चा होत आहे तर अनेक लोक याविषयी कौतुक देखील करत आहे.
Advertisement
आमिर खानचा जावई जिम ट्रेनर आहे आणि त्याच प्रकारची वेशभूषा त्यांनी त्याच्या लग्नात देखील केली होती. नुपूरने बनियान आणि शॉर्ट मध्ये वरातीत डान्स देखील केला तसेच सांताक्रुज ते बांद्रा दरम्यान जॉगिंग करत त्याने वरात आणली. याच वेशभुषेसोबत तो आयाराच्या बाजूला जाऊन देखील बसला आणि लग्नाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
Advertisement