शबनम न्यूज : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार, संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दहावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षकांसाठी सदर सेमिनार आयोजित करण्यात आले . दहावीचे वर्ष म्हणजे. विद्यार्थ्यांचं पालकांचे टेन्शन वाढविणारे वर्ष असते ,दहावीचा वर्ष हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारा वर्ष समजला जातो ,दहावीची परीक्षा पास होणे प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक असते आणि या परीक्षेचे टेन्शन विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही समसमान असते,
परंतु या दहावीच्या परीक्षेला सहजतेने कसे सामोरे जावे, दहावीच्या परीक्षेचे टेन्शन न घेता टेन्शन फ्री परीक्षा कशी द्यावी, परीक्षेची तयारी कशी करावी तसेच पालकांनी आपल्या मुला मुलींना दहावीच्या परीक्षेसाठी सहजपणे कसे तयार करावे अशा विविध बाबतीत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन होणे आवश्यक असते यासाठीच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
इंग्रजी मराठी सेमी माध्यम पेपर प्रजेंटेशन सह मार्क मिळविण्याच्या ट्रिक्स व टेन्शन फ्री बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. सदर शैक्षणिक उपक्रम युवा सेना सचिव पश्चिम महाराष्ट्राचे विश्वजीत बारणे. पिंपरी चिंचवडच्या महिला शिवसेना शहरप्रमुख सरिता साने. पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सदर मार्गदर्शन कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर देशमुख ,पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य डॉक्टर जयश्री अत्रे, भाषा विषय तज्ञ सुवर्ण कराडकर, शैक्षणिक सल्लागार अर्चिता मडके ,यांनी विद्यार्थ्यांना पालकांना तसेच शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी चिंचवडे लॉन, चिंचवड येथे संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थी, पालक ,शिक्षक यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, युवासेना अध्यक्ष विश्वजीत बारणे, शहर प्रमुख निलेश तरस ,शहर संघटिका सरिता साने ,रुपेश कदम, उपशहर संघटिका संगीता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.