शबनम न्यूज मीडिया ग्रुप : पिंपरी चिंचवड
शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच संपन्न झाले या नाट्य संमेलनाचे वृत्तांत विशेष पुस्तिकेचे प्रकाशन शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
पिंपरी चिंचवड शहरात शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मोठ्या उत्साहात भव्य दिव्य स्वरूपात मागच्या आठवड्यात पाच सहा व सात जानेवारी रोजी संपन्न झाले. आपल्या पिंपरी चिंचवड करांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट या निमित्ताने अनेक उत्कृष्ट नाटकांची , कार्यक्रमांची रेलचेल तसेच मनोरंजक कार्यक्रम ,बालनगरी येथे बालकांसाठी विविध नाटके व कला गुण सादर करण्याची संधी, या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने रंगभूमी व मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची हजेरी ,भव्य नाट्य दिंडी असे दैदिप्यमान नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाले, या नाट्य संमेलनाचे वार्तांकन शबनम न्यूज मीडिया ग्रुप वृत्तसंस्था वतीने ही करण्यात आले. या तीन दिवसांच्या वृत्तांताची शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने एक छोटीशी पुस्तिका तयार करण्यात आली. या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे वृत्तांत विशेष पुस्तिकेचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजक तथा अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले.या वृत्तांत विशेष पुस्तिकेमध्ये नाट्य संमेलनाचे उद्घाटन ते समारोप पर्यंतचे सर्व वृत्तांत प्रकाशित करण्यात आले आहे.