शबनम न्युज | पुणे
मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईत सुरुवात केली असून, अहमदनगर मार्गे ते मुंबईला जात आहेत. आज जरांगेचा ताफा पुण्यात पोहोचला असून, उद्या पिंपरी चिंचवड मध्ये मुक्कामी असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण साठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील मोर्चाचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम असून, दोन दिवसात मराठा आरक्षण न मिळाल्यास 26 जानेवारीपासून आपण आमरण उपोषणाला बसणार आहोत. सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी, आपण उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे जरांगे हे त्यांच्या उपोषणाचे निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगाव होऊन निघून नगर रोड ने कोरेगाव भीमा मार्गे, खराडीत मुक्काम केला. तेथून ही पदयात्रा खराडी बायपास, पुणे स्टेशन, औंध गाव, रक्षक सोसायटी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डी ,निगडी ,देहूरोड ,जुना एक्सप्रेस वे ने लोणावळा मुक्कामी जाणार आहे. जरांगे यांच्या रॅलीला मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.