शबनम न्युज | पुणे
पुणे जिल्हा स्काऊट गाईड प्रशिक्षण मध्ये सौ.प्रतिमा अरुण काळे,सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ या शाळेच्या शिक्षिका,लेखिका,कवयित्री यांनी गाईड प्राथमिक प्रशिक्षण अंतर्गत हळदी कुंकू समारंभ मध्ये भेट म्हणून त्यांचा प्रथम स्वरचित काव्य संग्रह “मी प्रतिमा माझी प्रतिमा* हा काव्य संग्रह दिला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.आपलीच एक सहकारी कविता करते याचा आनंद अधिक होता.हे तिच्यासाठी अभिमानास्पद होते.प्रशिक्षण दरम्यान मनोगत मध्ये त्यांनी त्यांचा साहित्य प्रवास ही व्यक्त केला..तसेच शिबिर सांगता यावर स्व रचित कविता ही सादर केली.
Advertisement