शबनम न्यूज , प्रतिनिधी :
भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्था वतीने 2023 – 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कै.सु.ना.बारसे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी चे ६९ विद्यार्थी चित्रकला परीक्षेला बसले होते ,या परीक्षे मध्ये विद्यालय चे ए ग्रेड मध्ये ११ विद्यार्थी, बी ग्रेड मध्ये १४ विद्यार्थी व सी ग्रेड मध्ये ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या या इंटरमिजिएट परीक्षेमुळे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये या निकालाचा फायदा होऊन त्यांच्या एकुण निकालाच्या गुणात वाढ होत असते.
या भरघोस यशामध्ये विद्यालयाचे सहशिक्षक श्री गंगाधर भदाडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .तसेच शाळेतील सर्व सहशिक्षकांचा सहभाग ही तितकाच महत्त्वाचा आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे सचिव प्रथमेश बारसे,शाळाप्रमुख प्रियांका बारसे, प्राचार्य वंदना लढे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हि अभिनंदन केले.
+