शबनम न्युज | मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडे हिचे कॅन्सर मुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती (शुक्रवारी 2) फेब्रुवारी रोजी तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने या संदर्भात सविस्तर इंस्टाग्राम पोस्ट शेअर गेली होती. यानंतर आज अभिनेत्रीने स्वतः ती जिवंत असल्याची माहिती देत सर्व घडामोडींची बाब स्पष्ट केली आहे.
“मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही, असं पूनमने तिच्या एका व्हिडिओद्वारे इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी देखील मागितली आहे.
“मी जिवंत आहे…सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या. ही बातमी पैशांसाठी नव्हे तर जनजागृतीसाठी पसरवली” असं पूनम पांडेने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.