शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड ; १९ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन द्वारे शिवजयंती निमित्त वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील मुला-मुलींसाठी “ जागर शिवचरित्राचा “ ही शिवचरित्रावर आधारित विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आली . त्यामध्ये नृत्य , पथनाट्य , वेशभूषा स्पर्धा आणि गायन स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले .
उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात सायंकाळी ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . एकूण , १०७ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला . त्यामध्ये , ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पि के इंटरनॅशनल स्कुल ग्रुप डान्स ने पटकावला तर सोलो गटामध्ये प्रथम क्रमांक – अदिती काटे , द्वितीय – प्रज्ञा शिंदे , तृतीय -आराध्या , चतुर्थ -इशिता भगत , पाचवे -शाल्वी , सहावे -प्रगती शिंदे ,सातवे -आर्यन बोबडे पारितोषिक यांनी पटकावले .
या अनोख्या स्पर्धेमागील संकल्पना विषद करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी अल्पवयीन असताना , संवगाड्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता . नव्या पिढीला आपल्या वैभवशाली वारश्यांची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे . तरच ; पुढील काळात नागरिकांची शिवविचारांनी भारलेली एक सुजाण पिढी घडणार आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप अभियंता सेलचे प्रमुख श्री.सागर बिरारी यांनी केले . याप्रसंगी , राजू शेलार , विवेक तितरमारे,वाल्मिक काटे ,विकास काटे, सहसंपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर ,विठ्ठल नांगरे ,रवींद्र पाटील विठाई वाचनालयाचे रमेश वाणी ,दिलीप चौघुले ,पि के स्कुलच्या प्राचार्य धनश्री सोनवणे , रश्मी मोरे , पालकवर्ग आणि परिसरातील सन्मानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.