शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक शांताराम कोंडीबा भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून तळवडे जोतिबा नगर येथील स्पार्कल कॅण्डल कंपनीतील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबास एक लाख रुपये असे एकूण 15 कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणीतून रोख स्वरूपात करण्यात आली आहे.
या प्रसंगी संगीता भालेकर, के.डी. वाघमारे, सुजाता काटे मामी, शितलताई वर्णेकर, विठ्ठल निवृत्ती भालेकर, अरुणदादा थोपटे, देवी इंद्रायणीचे बिर्जे साहेब, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे मा.अध्यक्ष वसंत पतंगे गुरुजी, घरजाईमाता ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गौतम मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले.
भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांचे बंधू कार्तिक सर लांडगे यांनी बापू हे माझ्याकडे आल्यानंतर वार्डातील समस्या घेऊन येत असतात एक समस्या सोडवून झाल्यानंतर पुढील दोन समस्या त्यांच्याकडे तयार असतात अशा प्रकारे वार्डातील त्या समस्या तळमळीने सोडून घेण्याचा पाठपुरवठा करून समस्या मार्गी लावतात .
शांताराम बाप्पू भालेकर यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये वाढदिवसाच्या औचित्य साधून कुठल्याही प्रकारचा ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचा कार्यक्रम टाळून, आपण समाजकार्य करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या वारसांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत देण्याचा मानस पूर्ण केला.
या कार्यक्रमास उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे, भोसरी विधानसभेचे आमदार पै.महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक सर लांडगे, मा.महापौर नितीनआप्पा काळजे, मा. महापौर राहुलदादा जाधव, मा.नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मा.नगरसेवक नारायण बहिरवडे, मा.नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, तळवडे गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक व त्याप्रमाणे महिला-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या